‘रागिनी एमएमएस २’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये प्रशंसा मिळवणारी सनी लिओनी दाक्षिणात्य चित्रपटांध्ये दिसणार आहे. ‘वडाकारी’ या चित्रपटातून ती दर्शकांचे लक्ष्य वेधणार आहे. हा एक थ्रिलर कॉमेडी चित्रपट असून यात सनीसोबत जय आणि स्वाती तिवारी यांच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यात सनीचा देशी अंदाज पाहावयास मिळाला.

या चित्रपटातील पाहुणी कलाकार असलेल्या सनीला भूमिकेकरिता एक कोटी रुपये दिल्याचीही चर्चा सुरु आहे. या भूमिकेत सनी लिओनी एकदम देशी रुपात तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. यात ती साडी नेसलेली आणि केसात गजरा माळलेली दिसेल. तिचा एक आयटम नंबरदेखील चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. बॉ़लीवूडनंतर आता सनी टॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमवत आहे. याचसोबत सनी आणखीही काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणार असून ‘टीना और लोलो’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone in desi look