पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे ती फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलिवूड’ ठरली आहे. विशेष म्हणजे या लोकप्रियतेच्या यादीमध्ये तिने अनुष्का शर्मालादेखील पिछाडीवर टाकलं आहे.
फेसबुकवर सनीचे २३ मिलिअन फॉलोअर्स असून सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेण्डी लुक्समुळे ती लोकप्रिय ठरली आहे. सनीने दुबई टूरचे फोटो आणि व्हीडीओज, तसेच आपल्या कुटूंबियांसोबतच फोटो, स्टाइलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले आहेत. ते पाहण्यासाठी चाहते तिच्या फेसबुक पेजला भेट देत असतात.यामध्येच तिच्या पोस्टची एंगेजमेंट वाढली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी तिच्या अकाऊंटवर चाहते सर्वाधिक एंगेज असल्याचं दिसून आलं.