सलमान खान त्याच्या उदारमतवादी वागणुकीमुळे सर्वांना आपालासा वाटतो, बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱयांना संधी देण्यासाठीचे त्याच्या प्रयत्नांबद्दल देखील सर्व परिचीत आहेत. कतरिना, सोनाक्षी आणि झरिन खान या बॉलीवूडमध्ये सध्या यशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींच्या करिअरची सुरूवात सलमानसोबतच्या चित्रपटानेच झाली होती. या अभिनेत्रींच्या यशस्वी करिअरमार्गात आपला काहीच वाटा नसल्याचे जरी सलमान म्हणत असला तर, हा त्याचा मोठेपणा असल्याचे मनोगत अभिनेत्री सनी लिओनीने व्यक्त केले.
बॉलीवूड हंगमा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सनीने सलमानवर स्तुतीसुमने उधळली. बॉलीवूडमध्ये आपण आज जे काही आहोत त्यात सलमानचा देखील वाटा असल्याचाही दाखला यावेळी सनीने जोडला. ती म्हणाली की, “सलमानमुळेच मी आज बॉलीवूडमध्ये आहे, असे म्हणायला काही हरकत नाही कारण, ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात मी स्पर्धक होते. स्पर्धेतून बाहेर पडताना सलमाननेच मला बॉलीवूडमधील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. याच शुभेच्छा मला बॉलीवूडध्ये काम करण्यास प्रेरणा देणाऱया ठरल्या. त्याच्यासोबत काम केले नसले तरी बिग बॉस दरम्यान, त्याने केलेले शुभचिंतन माझ्यासाठी न विसरण्यासारखे आहे.” सलमानसोबत काम करायला मिळावे हे माझे स्वप्न असल्याचेही सनी पुढे म्हणाली.
पॉर्न पटांकडून बॉलीवूडकडे वळालेल्या सनी लिओनी सुरूवातीला ‘बिग बॉस’ या ‘रिआलिटी गेम शो’मध्ये स्पर्धक म्हणून दाखल झाली होती. त्यातून प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सनीला ‘जिस्म-२’ चित्रपटाची ऑफर देऊ केली. त्यानंतर सनीने ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस-२’ या चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये प्रशंसा मिळवली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2014 रोजी प्रकाशित
सलमानमुळेच मी बॉलीवूडमध्ये- सनी लिओनी
सलमान खान त्याच्या उदारमतवादी वागणुकीमुळे सर्वांना आपालासा वाटतो, बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱयांना संधी देण्यासाठीचे त्याच्या प्रयत्नांबद्दल देखील सर्व परिचीत आहेत.

First published on: 18-12-2014 at 05:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone one day my dream of working with salman khan will come true