‘एक पहेली लीलाट या चित्रपटात प्रेक्षकांना एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा झाल्याचे पहायला मिळेल, असे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने सांगितले. ‘जिस्म-२’, ‘रागिनी एमएमएस-२’, ‘हेटस्टोरी-२’ अशा चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये बस्तान बसवल्यानंतर सनी लिओनी आता एक ‘पहेली लीला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना माझ्या अभिनयात आणि नृत्यकौशल्यात अनेक सुधारणा झाल्याचे दिसून येईल, असे सनीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. या चित्रपटादरम्यान, मला अभिनय आणि नृत्याबाबत खूप काही शिकायला मिळाल्याचेही तिने म्हटले. या चित्रपटासाठी सनी लिओनीने मारवाडी भाषाही शिकून घेतली होती. सनी लिओनीच्या मादक आणि बिनधास्त अदांमुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘एक पहेली लीला’ येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा- सनी लिओनी
'एक पहेली लीलाट या चित्रपटात प्रेक्षकांना एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा झाल्याचे पहायला मिळेल, असे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने सांगितले.
First published on: 01-04-2015 at 03:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone says she is grown as actor dancer