गेल्यावर्षी सनी लिओनी मराठी चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती. सुजय डहाकेच्या ‘वल्गर अॅक्टिव्हिटीज इन्कॉर्प’ या चित्रपटात ती काम करणार होती. मात्र, या चित्रपटाबद्दल अद्याप काहीही हालचाली झालेल्या दिसत नाही. असो, पण तरीही सनी मराठमोळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओनी लावणी सादर करताना दिसण्याची शक्यता आहे. ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टीव्हल’मध्ये (IMFFA) ती लावणी करणार असल्याचे वृत्त आहे. एखाद्या मराठी पुरस्कार सोहळ्यात नृत्य करण्याची सनीची पहिलीच वेळ आहे. तिच्यासोबत ईषा कोपीकर आणि उर्मिला मातोंडकर यादेखील नृत्य सादर करणार आहेत. यावेळच्या ‘इम्फा’ पुरस्काराची ‘मराठी इन बॉलीवूड’ अशी थिम ठेवण्यात आलेली आहे. आपल्या मादक अदांनी घायाळ करणाऱया सनीला आता बॉलीवूड गाण्यांऐवजी मराठमोळ्यया लावणीवर ठेका धरताना पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2015 रोजी प्रकाशित
अगं बाई.. सनीबाईंची ‘लावणी’!
मादक अदांनी घायाळ करणाऱया सनीला बॉलीवूड गाण्यांऐवजी लावणीवर ठेका धरताना पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 13-10-2015 at 13:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone will dance on lavani