‘पॉर्नपरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनने भारतीय मनोरंजन क्षेत्रात ‘बिग बॉस’ या रियालिटी शोद्वारे पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘जिस्म २’ या महेश भट कॅम्पच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे ‘शूट आऊट अ‍ॅट वडाला’ चित्रपटात तिने ‘आयटम साँग’ देखील केले.  आता ती दिग्दर्शक कैझाद गुस्तादच्या ‘जॅकपॉट’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. चित्रपटातील तिच्या व्यक्तीरेखेविषयी बोलताना कैझाद गुस्तादने सांगितले, ‘जॅकपॉट’ चित्रपटातील सनीची व्यक्तिरेखा ‘जिस्म २’मध्ये तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा खूप निराळी आहे. या चित्रपटात ती एका खंबीर स्त्रीची भूमिका साकारत आहे, जिची एक नजर कायम पैशावर असते. या चित्रपटात सनीला स्वत:चे असे स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. निव्वळ, कोणाची तरी ‘गर्ल-फ्रेन्ड’म्हणून चित्रपटात ती वावरत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटो गॅलरी : ‘जॅकपॉट’ प्रिमियर नाइट

कामाची आणि शिकण्याची आवड या सनीच्या जमेच्या बाजू असल्याचे कैझादला वाटते. सनीचे व्यक्तीमत्व उत्कृष्ट असून, तिला कामाची आणि शिकण्याची आवड आहे. ती घेत असलेली मेहनत पडद्यावर दिसून येते. जरी सनीला कामाचा जास्त अनुभव नसला, तरी मेहनतीद्वारे योग्य परिणाम साधण्याचा ती प्रयत्न करत असल्याचे तो म्हणाला. सनीविषयी भरभरून बोलणारा कैझाद, सनी चित्रपटात असल्याने ग्लॅमर आलेच आणि सनीच्या चाहत्यांची निराशा होणार नाही, हे सांगायला विसरत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunnys jackpot is not just her jism