अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्याची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून कसून चौकशी होत आहे. या चौकशीदरम्यान नवनवीन खुलासे दररोज होत आहेत. रियाच्या मोबाइल फोनमधून तिने डिलिट केलेले व्हॉट्स अॅप चॅट पुन्हा प्राप्त केले. यात अमली पदार्थांबाबतही संवाद होते. या संदेशांबाबत ईडीने सीबीआयसह एनसीबीलाही (अमली पदार्थविरोधी पथक) माहिती दिली. ड्रग्सविषयीचे ते चॅट्स मीच टाइप केले होते, अशी कबुली रियाने दिली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने हे वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- ‘सुशांत ड्रग्स घेत असता तर…’ एक्स असिस्टंटने केला खुलासा

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा- १७ हजारांचा इएमआय कसा भरु ? रियाच्या वक्तव्यावर सुशांतची बहीण संतापली; म्हणाली…

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput case rhea chakraborty admits drug chats were all typed by her ssv