मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजेच स्वप्निल जोशीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वप्निल आणि त्याची पत्नी लीना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, तिची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

TOP 10 NEWS : ‘सिम्बा’च्या पोस्टरपासून ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’पर्यंत..

स्वप्निल आणि लीना १६ डिसेंबर २०११ला विवाहबंधनात अडकले. त्यांना मायरा ही दीड वर्षांची मुलगी असून, तिचा जन्म २३ मे २०१६ झाला. त्यात आता मायराला छोटा भाऊ आल्यामुळे जोशी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लीनाने गोंडस बाळाला जन्म दिल्याचे कळतात स्वप्निलच्या मित्रपरिवाराने त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.

फ्लॅशबॅक : ती उगाचं परतली…

स्वप्निलसाठी यंदाचे वर्ष खूप खास आहे. त्याचा ‘भिकारी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच त्याने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडले’ ही नवीन मालिका सध्या प्रेक्षकांचे मन जिंकतेय. तसेच, तो मराठी चित्रपटांचीही निर्मिती करतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi blessed with a baby boy