गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील कलाकरांनी त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं आहे. त्यामुळे आज हे कलाकार अनेकांना जवळचे वाटतात. या मालिकेत बबिताजी हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता हिचे तर आजच्या घडीला असंख्य चाहते असल्याचं पााहायला मिळतं. मुनमुन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असून अनेकदा ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. अलिकडेच मुनमुनने तिचा एक फोटो शेअर केला आहे. यावर टप्पूने म्हणजेच अभिनेता राज अनादकटने कमेंट केली आहे. राजची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
अलिकडेच मुनमुनने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोमध्ये मुनमुन प्रचंड ग्लॅमरस दिसत असून अनेकांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मात्र, या सगळ्यात राज अनादकटने केलेली कमेंट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा- ‘तारक मेहता’मधील ‘या’ भाभी बरोबर झाली होती टप्पूच्या अफेअरची चर्चा
मुनमुनच्या या फोटोवर राजने हार्ट इमोजी असलेली कमेंट केली आहे. विशेष म्हणजे राजची ही कमेंट पाहिल्यावर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. तर काही जणांनी त्याची बाजू घेतली. त्यामुळे सध्या मुनमुनच्या फोटोपेक्षा राजच्या कमेंटचीच सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान, राज आणि मुनमुन यांच्यातील मैत्रीविषयी अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. दे दोघं एकमेकांचे चांगले मित्र असून बऱ्याचवेळा ते चर्चेचा विषय ठरत असतात.