‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते. मास्टर भिडे हे देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेत आत्माराम भिडे हे पात्र मंदार चांदवडकर यांनी साकारले आहे. त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती. आज लोकं खऱ्या आयुष्यात देखील त्यांना भिडे म्हणूनच ओळखतात.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंदार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकं मला मिस्टर भिडे याच नावाने ओळखतात असे म्हटले होते. दरम्यान त्यांनी त्यांचे किराणाच्या सामानाचे बिल देखील भिडे याच नावाने येत असल्याचे म्हटले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे मंदार यांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे.

‘मला खऱ्या आयुष्यातही भिडे म्हणूनच सगळे ओळखतात. माझे जे किराणा सामानाचे बिल येते त्यावर देखील भिडे असे लिहिलेले असते. मंदार या नावाने मला फार कमी लोकं ओळखतात. लोकांना मंदार या नावाने माझ्या घरचा पत्ता देखील माहिती नसेल. पण भिडे या नावाने मला सगळे जण ओळखतात’ असे मंदार यांनी म्हटले आहे.