ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपालीची भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे डान्स रील्स व फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. याशिवाय त्या त्यांचे दैनंदिन जीवनातील रुटीन व इतर अपडेट्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. इतकंच नाही तर त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

ऐश्वर्या नारकर खूपदा इन्स्टाग्राम लाइव्ह किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘आस्क मी एनिथींग’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असतात. त्या चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं देतात. खूपदा त्या इन्स्टाग्रामवर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया देतात. फोटो किंवा रील्सवर येणाऱ्या कमेंट्सना त्या उत्तर देतात. आता नुकतंच त्यांनी ‘आस्क मी एनिथींग’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या आवडत्या मराठी गाण्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ असं उत्तर ऐश्वर्या नारकरांनी दिलं.

ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट

तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता आहे? असं एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं. त्यावर त्यांनी ‘पिंजरा’ हा आवडता चित्रपट असल्याचं सांगितलं.

ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट

सिनेसृष्टीत बऱ्याच वर्षांपासून सक्रिय असलेल्या ऐश्वर्या नारकर यांना एका चाहत्याने त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारलं. तसेच आवडत्या रंगाबद्दलही प्रश्न विचारलं. ऐश्वर्यांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली. ऐश्वर्या नारकरांचे आवडते अभिनेते अरुण सरनाईक आहेत, तर त्यांना पांढरा रंग खूप आवडतो, असं त्यांनी स्टोरीमध्ये चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट

ऐश्वर्या नारकर यांचे आवडते अभिनेते अरुण सरनाईक यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी अनेक दमदार चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले. ‘एक गाव बारा भानगडी’, ‘मुंबईचा जावई’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’, ‘सिंहासन’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवलेले अभिनेते अरुण सरनाईक यांचे १९८४ मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात निधन झाले होते. त्यावेळी अरुण सरनाईक ४९ वर्षांचे होते.