विनोदांचा बादशाह कपिल शर्मा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कपिल ऑन द स्पॉट विनोद तयार करतो आणि लोकांना हसवतो, असं त्याच्या चाहत्यांना वाटत होतं, पण एका नेटकऱ्याने त्याचा टेलिप्रॉम्पटरवर पाहून विनोद करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि कपिल ट्रोल होऊ लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पवन शर्मा तुनिषाचा मामा नव्हे तर…” शिझान खानच्या बहिणीचा मोठा खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो टेलिप्रॉम्पटरवर स्क्रिप्ट वाचत असल्याचं दिसतंय. स्क्रीन झूम करून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यात सेटच्या खिडकीवर टेलिप्रॉम्प्टरची झलक दिसते. त्यावर स्क्रिप्ट लिहिली आहे आणि ते वाचून कपिल शूट करताना दिसतोय. व्हिडीओमध्ये कपिलला टेलिप्रॉम्प्टर वापरताना बघून युजरने आश्चर्य व्यक्त केलंय. ‘मला वाटायचं की कपिल स्वतःहून विनोद तयार करतो आणि बोलतो, पण तो माझा भ्रम होता, कपिलचे डायलॉग आणि जोक्स आधीच लिहिलेले असतात, तो टेलिप्रॉम्प्टर वापरून ते बोलतो,’ असं त्या युजरने म्हटलं होतं.

“शिझान-तुनिषाचं ब्रेकअप झालंच नाही” अभिनेत्याच्या बहिणीचा दावा; तुनिषाच्या आईवर केले गंभीर आरोप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अशातच कपिलच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेतली, तर कपिल ज्यांना आवडत नाही, त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. पण कपिलला सपोर्ट करणाऱ्यांची संख्या जास्त दिसत होती. लोकांनी कपिलचे कौतुक केले आणि एवढ्या मोठ्या शोचं शूटिंग करताना टेलिप्रॉम्प्टर गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘न्यूज अँकरदेखील बातम्या वाचताना टेलिप्रॉम्पटरची मदत घेतात’, ‘शूटिंग करताना डायलॉग विसरू नये, म्हणून त्याने टेलिप्रॉप्टरची मदत घेतली होती’. ‘जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करत असता, तेव्हा टेलिप्रॉम्पटर लागतंच, ऐनवेळी काही चुकलं तर मेहनत वाया जाऊ शकते, कदाचित ही प्रोसेस तुला माहित नसेल, म्हणून तू असं बोलतोय’. ‘अशा चुका काढायला तुमच्यासारख्या लोकांकडे खूप वेळ आहे,’ अशा प्रकारच्या कमेंट्स कपिलच्या चाहत्यांनी त्या व्हिडीओवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man shares video that kapil sharma uses a teleprompter his show fans defend him hrc