मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अभिजीत खांडकेकर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुखदा खांडकेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अभिजीतप्रमाणे सुखदा देखील उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवत आहे. नुकतंच सुखदा खांडकेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

सुखदा खांडकेकरने इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही थायलंडला फिरायला गेले होते. यात ते दोघेही समुद्रकिनारी उभे असल्याचे दिसत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला हे वर्ष खूप छान जावो”, असे कॅप्शन सुखदाने दिले आहे.

आणखी वाचा : हिंदी मालिकेच्या लेखिकेने लिहिला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट, केदार शिंदे म्हणाले “उगाचच मला…”

दरम्यान अभिजीत खांडकेकर सध्या ‘तुझेच गीत मी गात आहे’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. यात तो मल्हार कामतची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याची ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत टॉप १० मध्ये पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor abhijeet khandkekar birthday wife sukhada khandkekar special post nrp