अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केले होतं. या मालिकेत सोहम बांदेकरच्या पात्राचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर आता तो पुन्हा दुसऱ्या मालिकेत कधी झळकणार याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. नुकतंच त्याने याचे उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोहम बांदेकर हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनमध्ये चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्याला एका चाहत्याने “तुझी नवीन मालिका किंवा चित्रपट कधी येणार आहे? मी तुला स्क्रीनवर पाहण्यासाठी फार उत्सुक आहे”, असा प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींची परेदशात मजा-मस्ती; क्रूजवरील व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

त्यावर त्याने हटके शब्दात उत्तर दिले. “कदाचित लवकरच” असे सोहमने म्हटले आहे. त्याच्या या उत्तरामुळे आता लवकरच तो कोणत्या मालिकेत झळकणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

सोहम बांदेकर

आणखी वाचा : शुबमन गिलबरोबरचा डीपफेक फोटो, बनावट अकाऊंटमुळे सारा तेंडुलकर संतापली! पोस्ट करत म्हणाली, “अशा फसवणुकीमुळे…”

दरम्यान ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. याची निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेण्यात आला. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहम बांदेकर, अभिजीत श्वेतचंद्र, उदय सबनीस, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor soham bandekar reply on fan comment asking for his next serial nrp