ठाकुर अनूपसिंग हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. मिस्टर वर्ल्ड विजेता ठाकुर अनूपसिंग आपल्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या पर्दापणास सज्ज झाला आहे. अनूप अशोक जगदाळे दिग्दर्शित आगामी ‘बेभान’ या सिनेमात ठाकुर अनूप सिंगचा मराठमोळा अंदाज पाहता येणार आहे. ‘सिंघम -३’ या तेलगू तर ‘कमांडो २’ या हिंदी अशा आगामी सिनेमांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे. दिग्दर्शक अनूप अशोक जगदाळे यांच्या ‘बोभाटा’ या सिनेमाची चर्चा सिनेवर्तुळात जोरदार चालू आहे. या चित्रपटाचे मधूकर (अण्णा) उद्धव देशपांडे हे निर्माते असून सह निर्माते प्रसाद देशपांडे आहेत. दिनेश देशपांडे यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शांभवी फिल्मस या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या वर्षात प्रदर्शित होणा-या या सिनेमात आपल्याला ठाकुर अनूपसिंग आणि मृण्मयी देशपांडे यांची हटके जोडी पाहता येणार आहे. या दोघांसोबतचं स्मिता जयकर व संजय खापरे यांच्याही अभिनयाचा आस्वाद घेता येणार आहे. ए.वि प्रफुल्लचंद्र यांनी या सिनेमाला सुमधूर संगीत दिले असून मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. अनूप-अनूप अशा जोडगोळीचा रोमान्स विथ अॅक्शन असलेला सिनेमा २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे काही दिवसांपूरर्वीच विवादबद्ध झाल्यामुळे सोशल मीडिया आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चर्चेत आली होती. अग्निहोत्र, कुंकू यासारख्या मालिका आणि नटसम्राट, कट्यार काळजात घुसली या हिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृण्मयी देशपांडेचा विवाह सोहळा ३ डिसेंबरला म्हणजे शनिवारी पार पडला. मृण्मयी व्यावसायिक स्वप्नील राव याच्याशी विवाहबद्ध झाली आहे. पेशवाई थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला होता. मृण्मयीने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केल्यामुळे अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thakur anoop singh and mrunmayee deshpande will be seen in bebhan movie