बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचं तिसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. एवढंच नाही तर कमाईच्या बाबतीत हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटावरही भारी पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘राधे श्याम’ आणि अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाइल्स’ एकाच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. तीन दिवसांमध्ये या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटाच्या बजेटनुसार तुलना केली तर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘राधे श्याम’वर भारी पडला आहे. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटानं अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच ३.५५ कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण

सुरुवातीला हा चित्रपट ७०० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होतं. पण नंतर या चित्रपटाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता या स्क्रीन वाढवून ही संख्या २००० एवढी करण्यात आली. या चित्रपटाचं बजेट केवळ १४ कोटी रुपये एवढं आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ८.५० कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करत या चित्रपटानं १५ कोटी रुपये कमावले. याबाबचं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं आहे.

आणखी वाचा- Video : …म्हणून अक्षय कुमारनं श्रेया बुगडेला गिफ्ट दिला स्मार्टफोन!

आता पर्यंत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटानं २७.१५ कोटी रुपये एवढं कलेक्शन केलं. जर ही कमाई अशीच कायम राहिली तर हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होऊ शकतो. या चित्रपटात ९० च्या दशकात कशाप्रकारे काश्मिरी पंडितांना स्वतःचं घर सोडून जावं लागलं याची कथा दाखवण्यात आली आहे. प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटानं आता ३५ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाचं बजेटही तेवढंच तगडं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kashmir files film directed by vivek agnihotri and radhe shyam film day 3 box office collection mrj