भारतीय चित्रपट आता केवळ बॉक्स ऑफीसवरचं नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली कमाई करत आहेत. भारतीय चित्रपटांच्या कमाईत अमेरिकेचाही एक महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अशाच एका छोट्या भारतीय चित्रपटाने अमेरिकेत स्वत:ची छाप पाडली आहे.
बॉक्स ऑफिसने दिलेल्या आकडेवारीनुसार, `द लंचबॉक्स` चित्रपटाने अमेरिकेत २७ लाख डॉलरची कमाई केली आहे. या चित्रपटाचा रितेश बत्रा दिग्दर्शक असून, गुनीत मोंगा आणि अनुराग कश्यप निर्माता आहे. `द लंचबॉक्स` चित्रपटाने इंग्लिश विंग्लिश १९ लाख डॉलर्स, अग्निपथने १९ लाख डॉलर आणि क्रिश-२चा २२ लाख डॉलर हा रेकॉर्ड तोडला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
`द लंचबॉक्स`ची अमेरिकेत २७ लक्ष डॉलरची कमाई!
भारतीय चित्रपट आता केवळ बॉक्स ऑफीसवरचं नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली कमाई करत आहेत.

First published on: 13-05-2014 at 02:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lunchbox earns usd 2 7 million and counting at the us box office