आपल्या नृत्य कौशल्याने आणि अभिनयाच्या जोरावार तमाम लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मग ती त्याची एखादी भूमिका असो वा त्याचाी लव्हलाईफ असो. तो सतत चर्चेत असतो. पण सध्या एका भलत्याच कारणामुळे टायगर चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर टायगरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये टायगरला पोलिसांनी अटक केल्याचे दिसत आहे.
टायगरचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो त्याचा आगामी चित्रपट ‘बागी ३’ च्या सेटवरील आहे. टायगरच्या फॅनपेजवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये टायगरच्या आजूबाजूला गर्दी जमल्याचे दिसत आहे.
बागी चित्रपटांच्या यादीमधील हा अनुक्रमे तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात टायगरसह श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता रितेश देशमुख देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण जयपूरमध्ये सुरु आहे. दरम्यान चित्रपटातील एक सीनमध्ये टायगरला पोलीस पकडून नेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हा पोलीस दुसरा तिसरा कोणी नसून रितेश देशमुख आहे. रितेश व्यतिरिक्त आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे हे कलाकार देखील दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.