छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि बबिता जी यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना विशेष आवडतात. बबिताची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारताना दिसते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘रँप वॉक’ करताना दिसते. दरम्यान तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेलमध्ये शूट केल्याचे दिसत आहे. मुनमुनचा हा रँप वॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबिता घेते एका एपिसोडसाठी इतके मानधन

२००८ पासून मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिता अय्यर ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरवार पोहोचवले आहे. त्यापूर्वी ती २००४ मध्ये प्रदर्शित झालेली ‘हम सब बाराती’ या मालिकेत दिसली होती. बबिता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आता शेअर केलेला ‘रँप वॉक’चा व्हिडीओ देखील चर्चेत आहे.