“तुझ्यात जीव रंगला” या मालकितून घराघरात पोहचलेल्या राणादा आणि पाठक बाईंना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलंय.
या मालिकेतील पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधरदेखील चाहत्यांनी मोठी पसंती दिली. मालिका संपल्यानंतर अक्षयाने थोडासा ब्रेक घेतला आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. सतत वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
अक्षयाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती तिच्या काही मैत्रिणींसोबत भन्नाट डान्स करतना दिसतेय. “या तो दोस्ती गहरी है… या ये video 3D हैं!!!” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. ‘थ्री इडियटस्’ या सिनेमातील गाण्यावर अक्षयाने मैत्रिणींसोबत जबरदस्त डान्स केल्याचं दिसतंय.”यांनी मला डान्स करायला लावलं” असं कॅप्शनमध्ये लिहत तिने तिच्या दोन्ही मैत्रिणींना टॅग केलंय. अक्षयाच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून तुफान लाईक मिळत आहेत.
अक्षया सोशल मीडियावर तिचे अनेक गॅमरस फोटोदेखील पोस्ट करत असते. अद्याप अक्षयाने तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली नसली तरी चाहते मात्र अक्षयाला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.