‘बंदिनी’ आणि ‘नागार्जुन’सारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता मृणाल जैन सध्या खूप चर्चेत आहे. मृणाल अभिनेत्री वर्षा भगवानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. वर्षा भगवानीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मृणालसंदर्भात सर्वांना आश्चर्यचकित करणारा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलाखतीत वर्षा म्हणाली की, ‘पत्नी स्विटीला घटस्फोट देऊन तो माझ्यासोबत लग्न करणार असल्याचं तो मला म्हणाला होता, मात्र असे झाले नाही. इतकंच नाही तर मृणालने माझ्यावर कारमध्ये जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिल्यामुळे तो माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला. यासंदर्भात मी त्याच्या पत्नीकडे तक्रार केली असता ती मृणालला सोडून गेली. त्यानंतर त्याने मला शिवीगाळसुद्धा केली.’

 

वाचा : सोशल मीडियावरचा हास्यास्पद ‘ट्युबलाइट’

अभिनेत्री वर्षा भगवानीने यासंदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्यात मृणालविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र कुटुंबियांच्या दबावामुळे नंतर ही तक्रार मागे घेतल्याचे स्पष्टीकरण तिने दिले. या नातेसंबंधाबद्दल बोलताना वर्षा पुढे म्हणाली, ‘पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मी माझ्या हाताची नसदेखील कापून घेतली होती. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.’

मृणाल जैन आणि त्याची पत्नी स्विटी

वर्षाच्या म्हणण्यानुसार मृणालच्या घरच्यांनी त्याच्या मनाविरोधात स्विटीसोबत त्याचं लग्न लावून दिलं होतं. वर्षभरापासून वर्षा मृणालला डेट करत होती. मात्र आता विविध कारणे देत मृणाल पत्नीला घटस्फोट देण्यास नकार देत असल्याचं वर्षा म्हणतेय. मृणालच्या या विवाहबाह्य संबंधाबाबत आणि वर्षा भगवानीने केलेल्या आरोपांबाबत तो स्वत:च स्पष्टीकरण आणि खुलासा देऊ शकतो. त्यामुळे मृणाल आता काय बोलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actor mrunal jain had an extra marital affair