राजस्थान, गुजरात, हरयाणा, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. शिवाय राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारच्या फेरविचार याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या होत्या. पण तरीही करणी सेनेचा विरोध काही केल्या कमी झाला नाही. प्रदर्शनाच्या दिवशी अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. याविरोधात नेटकऱ्यांनी मिळून आता एक मोहीम सुरु केली आहे. गुजरातमध्ये हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी ट्विटरवर सध्या जोरदार मोहीम सुरू असून #BringPadmaavatToGujrat हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
‘जर देशभरात कोणीही हा चित्रपट पाहू शकतात, तर गुजरातमधील लोक पद्मावत का नाही पाहू शकत?,’ असा सवाल ट्विपल्सनी या हॅशटॅगसह केला आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नसून राजपूतांची गौरवगाथाच यातून सांगितल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. मग गुजरातमध्ये कोणत्याही विरोधाशिवाय हा चित्रपट का प्रदर्शित होऊ देत नाही असा संतप्त सवाल ट्विटरकर करत आहेत.
https://twitter.com/IamSmirza/status/956840382850936833
https://twitter.com/BeautifulKiu/status/956835794789982208
https://twitter.com/Aashima111/status/956837608860119041
https://twitter.com/BabuBeg/status/956844047708012544
Because of these few stupid protestors people cant enjoy a good epic movie…aur inki harkatein jyada offensive hai..movie toh kuch bhi nahi hai Inko ban karo, Padmaavat ko nahi. It’s time to #BringPadmaavatToGujarat pic.twitter.com/JAnvy1oDVo
— ⓐⓢⓗⓤ™®♚ (@arshontop) January 26, 2018
वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले
बुधवारी आणि गुरुवारी देशातील बहुतांश ठिकाणी करणी सेनेकडून आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित होऊच नये अशी करणी सेनेची भूमिका आहे. तर दुसऱ्या बाजूस जिथे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तिथे लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बरेच शो हाऊसफुल झाले आहेत. पहिल्याच दिवशी १८ कोटींची कमाई या चित्रपटाने केल्याचे म्हटले जात आहे.
Gujarat being part of India should get a chance to watch Padmaavat. RT and spread the word#BringPadmaavatToGujarat
— Aashiश Joशी (@aashishjoshi00) January 26, 2018