यशराज फिल्म्सच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटात आपल्या बोल्ड लूकने तरुणाईला घायाळ करणाऱ्या अभिनेत्री वाणी कपूरचा आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाणीबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ ऑगस्ट १९८८ रोजी दिल्लीत वाणीचा जन्म झाला. तिचे वडील फर्निचर व्यावसायिक आहेत तर आई मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. टूरिझममध्ये आवड असल्याने सुरुवातीला वाणीने त्यातच पदवी घेण्याचा निर्णय घेतला. टूरिझममध्ये पदवी घेतल्यानंतर तिने काही दिवस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. त्याआधी ओबेरॉय हॉटेल आणि जयपूरमधील एका रिसॉर्टमध्ये तिने इंटर्नशिपही केली. याच इंटर्नशिपच्या आधारावर तिला आयटीसी हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. तिचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व पाहता हॉटेलमध्ये काम करत असतानाच तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या.

मॉडेलिंग करत असतानाच यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटासाठी ऑडिशन्स सुरु असल्याचे तिला कळले. ती ऑडिशनला गेली आणि तिथे तिची निवड झाली. मात्र बॉलिवूड पदार्पणाला तिच्या वडिलांचा विरोध होता. ‘चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा माझा निर्णय वडिलांना कधीच मान्य नव्हता. मुलींनी लग्न करुन संसारात रमावं, असाच त्यांचा विचार होता. माझ्या मोठ्या बहिणीचे अठराव्या वर्षीच लग्न झालं. पण माझ्या निर्णयात मला आईने साथ दिली,’ असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

FEMA उल्लंघनप्रकरणी हजर राहण्यास ‘ईडी’कडून शाहरुखला मुदतवाढ

‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातून वाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अर्थात अद्यापही वाणीला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळवता आलं नाही. मात्र सोशल मीडियावर तिने शेअर केलेला स्ट्रिपिंग व्हिडिओ असो किंवा तिच्या हनुवटीची कॉस्मेस्टिक सर्जरी या विषयांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaani kapoor worked in hotel before entering bollywood