उन्हाळ्याच्या सुट्टीत हॉलीवूडपटांनी इथे ठाण मांडले आहे. एकापाठोपाठ एक अ‍ॅनिमेशन आणि सुपरहिरोपट प्रदर्शनासाठी सज्ज असून इंग्रजीसह िहदी भाषेतही प्रदíशत होणाऱ्या या चित्रपटांसाठी िहदीतील गाजलेल्या कलाकारांचे आवाज दिले जात आहेत. गेल्या आठवडय़ात प्रदíशत झालेल्या ‘द जंगलबुक’साठी इरफान खानपासून प्रियांका चोप्रापर्यंत आवाज होते. तर आता ‘कॅप्टन अमेरिका’साठी आपला आवाज देत वरुण धवनही या मांदियाळीत सामील होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द जंगलबुक’ने गेल्या आठवडय़ांपासून तिकीटबारीवर धूम मचवली आहे. ‘डिस्ने’च्या या चित्रपटानंतर त्यांचाच ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ हा माव्‍‌र्हलपट प्रदíशत होणार आहे. िहदी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकारांचा आवाज हॉलीवूडपटांसाठी वापरला तर प्रेक्षकांना ते जास्त जवळचे वाटतात, त्यामुळेच सध्या या चित्रपटांच्या िहदी आवृत्तीसाठी जाणीवपूर्वक नावाजलेल्या िहदी कलाकारांचा आवाज दिला जात आहे. योगायोगाने, ‘डिस्ने स्टुडिओ’ने याआधी वरुण धवनबरोबर ‘एबीसीडी २’ चित्रपटासाठी काम केले असल्याने ‘कॅप्टन अमेरिका’ या सुपरहिरोला आवाज देण्यासाठी वरुण धवनची निवड करण्यात आली आहे.

मूळ चित्रपटात स्टीव्ह रॉजर अर्थात कॅप्टन अमेरिकाची भूमिका क्रिस इव्हान्स या हॉलीवूड अभिनेत्याने केली असून िहदी आवृत्तीत त्याचे संवाद वरुणच्या आवाजात ऐकायला मिळणार आहेत. ‘डिस्ने’कडून जेव्हा या कामासाठी विचारणा झाली तेव्हाच उत्सुकता निर्माण झाली होती, असे वरुण धवनने सांगितले.

व्हॉइस ओव्हर देणे हे अवघड काम असते. त्यामुळे त्या कलाकारांबद्दल आपल्याला प्रचंड आदर असल्याचे वरुणने सांगितले. कॅप्टन अमेरिकाची सुपरहिरो म्हणून जी भूमिका आहे, तत्त्व आहेत ती आपल्या आवडीची आहे, त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज देणे हे आपल्यासाठी थोडेसे आव्हानात्मक पण आनंददायी गोष्ट ठरणार असल्याचेही वरुणने सांगितले.

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan to dub for hindi version of captain america