बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार  उपस्थित होते.
दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू देखील यावेळी उपस्थित होत्या. याक्षणी भावूक झालेल्या सायराजींनी दिलीप यांच्या कपाळाचे चुंबन घेत त्यांचे अभिनंदन केले.  अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याला दिलीप यांना उपस्थित राहता आले नव्हते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


दोन दिवसांपूर्वीच दिलीप कुमार यांचा ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veataran actor dilip kumar honoured with padma vibhushan