काही चित्रपट व त्यातील गाणी ललाटी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले. दहा, वीस, पंचवीस, पन्नास नव्हे तर साठ वर्षे उलटून गेली असली तरी तो चित्रपट, त्यातील गाणी आणि चित्रपटाचा ‘नायक’ अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘त्या’ चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला. चित्रपटातील ‘शाम ढले खिडकी तले’, ‘भोली सुरत दिलके खोटे’ ही संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आणि आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. तो ऐतिहासिक चित्रपट होता ‘अलबेला’. या चित्रपटात चित्रपटात मा. भगवान आणि गीता बाली हे मुख्य कलाकार होते. खास नृत्यशैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे मा. भगवान अर्थात मराठमोळे भगवान पालव यांच्या जीवनावर आधारित ‘एक अलबेला’ हा मराठी चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या अभिनेत्याच्या जीवनावर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. एक अलबेलात अभिनेता मंगेश देसाई याने भगवान दादांची तर विद्या बालनने गीता बाली यांची भूमिका साकारली आहे. तर कसा आहे मंगेश आणि विद्या यांचा एक अलबेला हे जाणून घेऊया.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2016 रोजी प्रकाशित
REVIEW: एक अलबेला
काही चित्रपट व त्यातील गाणी ललाटी भाग्यरेषा घेऊनच येतात.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 24-06-2016 at 13:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan and mangesh desais ekk albela movie review