बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज असून, सध्या कॅनडात ‘xXx’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. हॉलीवूड स्टार विन डिझेलने नुकताच दीपिकासोबतचा एक छोटेखानी व्हिडिओ शेअर करून ‘xXx’ हा चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करेल, अशी ग्वाही दिली. ‘मनोरंजनासाठी तयार रहा’, असा संदेश विन डिझेल व्हिडिओतून दिला असून, दीपिका देखील तिच्या स्टाईलमध्ये प्रतिसाद देताना दिसते. दीपिकाने ‘xXx’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकराणासाठी ५ फेब्रुवारीपासून सुरूवात केली आहे. या चित्रपटासाठी दीपिका सध्या भरपूर मेहनत घेत असून, सेलिब्रेटी ट्रेनर यास्मीन कराचीवालाकडे तिचे ट्रेनिंग सुरू आहे. ‘xXx’ चित्रपटात दीपिका सरेनाची भूमिका साकारत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2016 रोजी प्रकाशित
विन डिझेलने शेअर केला दीपिकासोबतचा व्हिडिओ, ‘xXx’ चित्रपटातून मनोरंजनाची ग्वाही
दीपिका देखील तिच्या स्टाईलमध्ये प्रतिसाद देताना दिसते.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 09-02-2016 at 11:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vin diesel shares first video with deepika padukone promises entertainment in xxx