‘होणार सून मी या घरची” या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा श्री अर्थात शशांक केतकर गायक बनला आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण ही कोणती ही अफवा नसून “सागरिका म्युझिक” च्या “यारा…” या नवीन रोमॅंटिक ड्यूएट गाण्यासाठी शशांक केतकर आणि गायिका दीपिका जोग यांनी पार्श्वगायन केले असून ह्या गाण्याचा व्हिडीओ सुद्धा त्याच्यावरच चित्रित करण्यात आला आहे. Loksatta Live या यूट्यूब चॅनेलशी गप्पा मारताना शशांकने या गाण्याच्या काही ओळी आपल्या चाहत्यांसाठी गुणगुणून दाखविल्या.
“यारा… ” या सुमधुर गाण्याचे शब्द गीतकार वैभव जोशी यांनी लिहिले असून संगीत जसराज जोशी, सौरभ भालेवर आणि हृषिकेश दातार या त्रिकुटाने दिले आहे. या गाण्याचा व्हिडिओ प्रेक्षकांना सागरिका म्युझिकच्या युट्युब चॅनेल पाहता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2015 रोजी प्रकाशित
पाहाः शशांक केतकरचा गायनाचा श्रीगणेशा!
'होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा श्री अर्थात शशांक केतकर गायक बनला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-04-2015 at 10:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch actor shashank ketkar become a singer