‘गॅग ऑफ वासेपुर’, ‘देढ इश्किया’, ‘बदलापूर’, ‘जॉली एलएलबी २’ हे सिनेमे असो किंवा आताचा ‘दोबारा’ हा भयपट हुमा कुरेशीने तिच्या प्रत्येक सिनेमातून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. दोबारा सिनेमातून पहिल्यांदाच हुमा आणि तिचा भाऊ साकिब यांनी एकत्र काम केले आहे. हिंदी भयपट हे नेहमीच हास्यास्पद मानले जातात पण हा भयपट वेगळा असून हॉलिवूडमधील एका सिनेमाचा ही अधिकृत रिमेक असल्याचे तिने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या आगामी सिनेमाबद्दल नवभारत टाइम्सशी बोलताना हुमा म्हणते की, ‘साधारणपणे बॉलिवूडमधील सिनेमे हे अनेकदा कोरियन, चायनीज अशा सिनेमांच्या संकल्पना घेऊन बनवले जातात. त्याला हिंदीचा टच देण्यासाठी त्यात गाणीही बसवली जातात. आपल्याला अशा चोरीची सवयच लागली असल्याचे हुमाने एका मुलाखतीत म्हटले. याशिवाय आपण ज्यांच्याकडून या संकल्पना घेतो त्यांना याचं क्रेडिट तर देतच नाही शिवाय आभारही मानत नाहीत हे खरं तर दुर्दैव आहे. अजून एक निराशेची बाब म्हणजे संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघता येईल असा भयपट आपल्या भारतात बनत नाही. पण ‘दोबारा’ हा असा सिनेमा आहे जो सहकुटुंब पाहता येईल.’

‘मला जेव्हा साकिबबरोबर या सिनेमात काम करायचं होतं त्याला मी थेट नकार दिला. कारण तो माझा भाऊ आहे हे मी सेटवर विसरूच शकत नव्हते. सेटवरही मी त्याला जोरजोरात ओरडून बोलायचे. ये अयोग्य आहे हे मला माहित होतं पण मी त्याच्यासोबत प्रोफेशनल वागू शकत नव्हते. पण त्याउलट साकिब आहे, तो फारच प्रोफएशनल आहे.’

वैयक्तिक आयुष्यात हुमाला सगळे दात तुटण्याची फार भिती वाटते. तिला या गोष्टीची एवढी भिती आहे की तिला आपले सगळे दात तुटले आहेत अशी स्वप्नही पडतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We are habitual of making pirated movies says huma qureshi