बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीचे अनेक चाहते आहेत. पण जेव्हा सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते तेव्हा मात्र चित्र काहीसे वेगळे होते. तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांपेक्षा तिच्या भूतकाळामुळे भुवया उंचवणारेच जास्त होते. पण या सगळ्यावर सनीने मात केली आणि आज तिने बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. सुरूवातीला सनीला मुंबईमध्ये भाड्याने घर देण्यासही कोण तयार नव्हते. मात्र तिच्या या कठीण काळात तिला बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने आपले मुंबईतले घर भाड्याने दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साधारण २०१५ मध्ये सेलिनाने मुंबईतील अंधेरी येथील घर सनीला राहायला दिले होते. सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर या घरात राहू लागले. एकेदिवशी सेलेना घर पाहण्यासाठी म्हणून घरी गेली असता तिने घराची झालेली दुर्दशा पाहिली. असे म्हटले जाते की, संपूर्ण घर अस्ताव्यस्थ होते. घरातले फर्निचरही कुजले होते तर भिंतींवर जाळे तयार झाले होते. शिवाय सनीने घरमालकाला अर्थात सेलेनाला न विचारता घरात वेगेळे काम करुन घेतले होते.

घराची झालेली ही दुरावस्था पाहून सेलेनाला आधीच धक्का बसला होता. पण या धक्क्याची जागा रागाने घेतली जेव्हा तिने बाथरुमची अवस्था पाहिली. बाथरुम एवढे घाण होते की त्यामध्ये जाण्याचे तिने धाडसच केले नाही. चांगल्या मनाने दिलेल्या आपल्या घराची ही अवस्था पाहून सेलेना चांगलीच संतापली. तिने सनी आणि वेबरला तातडीने घर खाली करण्यास सांगून त्यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती.

पण या सर्व अफवा असून माझ्यात आणि सेलेनामध्ये कधीच वाद झाला नाही असे सनीचे म्हणणे आहे. आता खरे काय नी खोटे काय हे फक्त सनी आणि सेलेनाच सांगू शकतात. सेलेना दुसऱ्यांदा जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. याआधीही सेलेनाला विनस्टन आणि विराज ही जुळी मुलं आहेत. सनी लिओनीच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, राजीव वालिया दिग्दर्शित तेरा इंतजार या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अरबाज खानही आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When celina jaitley sent sunny leone to the flat on the rent flat she had notices because of the mess