लाखो चाहते असणारी भारताची फुलराणी म्हणजेच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही वेगळ्याचं व्यक्तीसाठी घायाळ होते. बॅडमिंटन कोर्टवर भल्याभल्यांना धूळ चारणा-या सायनाला हरवलेयं ते बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान याने.


सध्या शाहरुख त्याच्या आगामी दिलवाले या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. यावेळी शाहरुखला भेटण्यासाठी सायना चित्रपटाच्या सेटवर गेली होती. कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या सेटवर आपण शाहरुखचे फॅन असल्याचे व्यक्त करणा-या सानियानेही याबाबत ट्विट केले.