झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’ मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवंता तिचं सामान घेऊन अण्णा नाईकांच्या वाड्यावर तळ ठोकायला आली आहे. माईंसमोर अण्णा आणि शेवंताचं प्रकरण उघड झाल्यावर माई मात्र तिला वाड्यात घ्यायला नकार देतात. शेवंता मात्र हार मानण्याऱ्यातली नाही आहे, ती तिकडेच पारावर बसून रात्र काढते. आता शेवंताचं पुढचं पाऊल काय असेल? तिला नाईकांच्या वाड्यात प्रवेश मिळेल का? माईंचा नकार असताना अण्णा तिला वाड्यात घेतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

गूढ कथानक व मालवणी भाषेमुळे रात्रीस खेळ चाले – २ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली आहे. मालिकेचे कथानक सध्या अण्णा व शेवंता यांच्या भोवती फिरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will shevanta get entry in naik wadi ratris khel chale 2 ssv