कमल हसनसोबत काम करणे हा माझा आजीवन अनुभव असल्याचे तामिळ-हिंदी चित्रपट ‘विश्वरुपम’ची मुख्य कलाकार पूजा कुमार हिने म्हटले आहे. वादात्मक गुप्तचर रोमांचकारी चित्रपट ‘विश्वरुपम’च्या रिमेकमध्येही ३६ वर्षीय माजी सुंदरी पूजा दिसणार आहे. पूजा म्हणाली की,” कोणत्याही अभिनेत्रीसाठी कमल हसनसोबत काम करणे म्हणजे स्वप्नपूर्ती होण्यासारखे आहे. चित्रपटाच्या दुस-या भागातही त्यांच्यासोबत मी काम करणार आहे. ‘विश्वरुपम’मधील इतर कलाकारही या चित्रपटाच्या रिमेकमध्येही दिसणार आहेत. तसेच श्रीदेवीनंतर मी दुसरी अशी अभिनेत्री आहे जिला त्यांच्यासोबत दुस-यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे.”
पूजा म्हणाली की, चित्रपटातील माझे डिझायनर गौतमजी यांनी माझे नाव कमल यांना सूचित केले होते. त्यानंतर स्काइपद्वारे माझे ऑडिशन घेण्यात आले. कमल हसन यांना ऑनलाइन पाहिल्यावर मी थोडे घाबरले होते. मात्र, दोन मिनिटांच्या या ऑडिशननंतर माझी निवड करण्यात आली आणि दोन आठवडयांमध्येच चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता मी चेन्नई गेले. कमल यांना इतिहास, विज्ञान आणि तत्वज्ञान यांचे अफाट ज्ञान असून ते एक ज्ञानकोश आहेत, असेही पूजा म्हणाली. ‘विश्वरुपम २’ दिवाळीपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
पूजाने चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला २००० साली एका तामिळ चित्रपटाने सुरुवात केली. त्यानंतर रणबीर आणि प्रियांकाच्या ‘अनजाना-अनजानी’ चित्रपटातही तिने छोटीशी भूमिका साकारली होती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2013 रोजी प्रकाशित
कमल हसनसोबत काम करण्यास मिळणे ही स्वप्नपूर्ती – पूजा
कमल हसनसोबत काम करणे हा माझा आजीवन अनुभव असल्याचे तामिळ-हिंदी चित्रपट 'विश्वरुपम'ची मुख्य कलाकार पूजा कुमार हिने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-07-2013 at 06:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Working with kamal haasan a lifetime experience says vishwaropam actress pooja