सुपरस्टार आमीर खानबरोबर काम करायला मिळाल्यास मी जगातील सर्वात आनंदी तरुणी असेन, अशी भावना अभिनेत्री सनी लिओनीने व्यक्त केली आहे. मस्तीजादे या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सनी बोलत होती. आमीरसारख्या उत्कृष्ट अभिनेत्याबरोबर काम करणे हे कोणत्याही नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. आमीरसोबत काही क्षणांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यास मी सर्वात आनंदी तरुणी असेन, अशी प्रतिक्रिया तिने दिली.
आमीर खान कदाचित माझ्या पार्श्वभूमीमुळे माझ्याबरोबर काम करत नसल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनीने म्हटले होते. दरम्यान, ही मुलाखत जेव्हा आमीरच्या पाहण्यात आली तेव्हा त्याने ट्विट करून सनी लिओनीला मला तुझ्याबरोबर काम करायला आवडेल, असे सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Would be happiest girl if i could work with aamir sunny leone