सर्वजण गेल्या काही दिवसांपासून ‘xxx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा करत होते. यामागचे कारण अर्थातचं बॉलीवूड दीवा दीपिका पदुकोण आहे. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. दीपिकाचा पहिला वहिला हॉलीवूड चित्रपट तो ही हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेल सोबत त्यामुळे दीपिकाच काय पण तिचे जगभरातील तमाम चाहते तिच्या या चित्रपटाची वाट बघत आहेत.
‘xxx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’ चा ट्रेलर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या ‘xxx : द रिर्टन ऑफ झेंडर केज’च्या ट्रेलरने सर्वांना झटकाचं दिला. यात विन आपण जगत असलेल्या आताच्या जगाचे समर्थन करणा-या एका सोल्जरच्या भूमिकेत दिसतो. तर सॅम्युअल एल जॅक्सन हा आत्ताचे जग अजिबात सुरक्षित नसल्याचे बोलताना दिसतो. पण यात दीपिका कुठेय? ट्रेलरमध्ये तीन सीन्समध्ये दीपिकाची झलक पाहावयास मिळते. यात ती चाकू आणि गनने लढताना दिसते. मात्र यात दीपिकाला एकही संवाद दिलेला नाही.
दोन दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यात दीपिकाने आपल्या बोल्ड अंदाजाने अगदी काही मिनिटांत चाहत्यांची मने जिंकली होती. पुढच्या वर्षी २० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2016 रोजी प्रकाशित
XXX trailer VIDEO: दीपिका, विन डिझेलच्या ‘xXx’ चा ट्रेलर
दीपिकाने आपल्या बोल्ड अंदाजाने अगदी काही मिनिटांत चाहत्यांची मने जिंकली
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 20-07-2016 at 11:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xxx trailer deepika padukone is practically missing from this vin diesel vehicle