गूढ, थरारपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका म्हणजे वच्छी. अभिनेत्री संजीवनी पाटील ही भूमिका साकारत आहे. वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्सदेखील तितकाच लोकप्रिय आहे. स्वत:च्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील. आता Year endच्या पार्टीमध्ये तुम्ही वच्छी डान्स चॅलेंज स्वीकारु शकाल का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहा व्हिडीओ-

वच्छी या भूमिकेला आणि तिच्या अफलातून डान्सला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे. सोशल मीडियावर डान्सवरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले. पण या डान्समागणी पार्श्वभूमी कोणालाच माहीत नाही. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत संजीवनी पाटील यांनी वच्छीच्या खास डान्समागची कहाणी सांगितली.

कोणत्याही कोरिओग्राफरशिवाय केलेला वरातीतला हा डान्स तुफान हीट ठरला. मालिकेत येत्या काही दिवसांत वच्छीच्या भूमिकेला महत्त्वाचं वळण येणार आहे. कथानकातील हे वळण नेमकं काय असेल हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year end 2019 party can you accept vacchi dance challenge ssv