राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (JEE) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) ठरल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अनेक राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली होती. मात्र विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच परिक्षा ठरल्या वेळेतच होतील, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे. दरम्यान या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूब याने नाराजी व्यक्त केली आहे. माणसं मेली तर चालतील का? असा सवाल त्याने विचारला आहे.
रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार
नेमकं काय म्हणाला जिशान?
जीशान अय्यूब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो आपली मतं रोखठोकपणे मांडतो. यावेळी NEET परिक्षेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. “माणसं मेली तरी चालतील पण परिक्षा पुढे जाता कामा नये, वाह साहेब कमाल आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
झाडाखाली बसलेल्या मोदींचा फोटो पाहून बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणतो…
आदमी मरे तो मरे, पर इम्तिहान नहीं टलना चाहिए।
वाह साहब वाह!!!— Mohd. Zeeshan Ayyub (@Mdzeeshanayyub) August 25, 2020
NEET आणि JEEच्या परिक्षेंबाबत काय म्हणाले होते शिक्षणमंत्री?
जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे. “जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती,” असं त्यांनी सांगितलं आहे. “जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे,” असं रमेश पोखरियाल निशंक यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
