आई तिच्या सहा वर्षाच्या मुलाचा फोटो काढण्यासाठी

त्याला फोटो-स्टुडिओमध्ये घेऊन जाते.

फोटोग्राफर मुलाला सांगतो,

“बाळा, माझ्याकडे बघ. या कॅमेऱ्यातून आता कबूतर निघेल.”

यावर मुलगा म्हणतो, “फोकस अ‍ॅडजेस्ट करा, काहीही बोलू नका.

पोट्रेट मोड वापरा, मॅक्रोबरोबर. ISO 200 च्या आत ठेवा.

फोटो हाय-रेझोल्युशनमध्ये आला पाहिजे.

फेसबुकवर अपलोड करायचा आहे, नाहीतर पैसे मिळणार नाहीत.”