गण्या पहिल्यांदाच फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला त्याने चहाची ऑर्डर दिली.
वेटरने गरम पाणी, पाऊचमध्ये चहा पावडर, साखर, दुध या गोष्टी आणून समोर ठेवल्या.
गण्याने कसाबसा चहा बनवून घेतला आणि तो प्यायला.
वेटर – सर, तुम्ही अजून काही घेणार का?
गण्या – भजी खायची होती मला. पण तू आता तेल, कढई, बेसन, मीठ-मसाला सगळं आणून समोर ठेवशील. नको, जाऊ दे…