मनसेच्या रोजगार विभागाने रविवारी आयोजिलेल्या रोजगार मेळाव्यात ६५ कंपन्यांनी थेट मुलाखतीनंतर १७०० युवक, युवतींना नोकरीची पत्रे दिली. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून चार हजारहून अधिक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज भरले होते, असे मनसेच्या पत्रकात म्हटले आहे.
आमदार मंगेश सांगळे यांच्या पुढाकाराने मनसेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनाला मनसेची समस्त नेतेमंडळी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये कर्णबधीर उमेदवारांनाही नोकरी मिळाल्याची माहिती देण्यात आली. ज्या तरुण-तरुणींनी या मेळाव्यात नोकरीसाठीचे अर्ज भरून दिले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगळे यांनी या वेळी सांगितले.