९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राज्यस्तरीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. राज ठाकरे हे या पक्षाचे प्रमुख आहेत. रेल्वे इंजिन हे या पक्षाचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.
पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्विकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाच्या केवळ एका उमेदवाराला बहुमत मिळाले. पुढे २०२० मध्ये या पक्षांने आपल्या नव्या विचारसरणीबाबतची घोषणा करत नवा झेंडा स्वीकारला. Read More
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली.
ठाण्यात टोलवाढ होणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी टोल प्राधिकरणाला अल्टिमेटम दिला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसह ठाण्यातील टोलनाक्यावर आंदोलनही केले.