मनसेचे राज्यात ३८ ठिकाणी जलसंधारण प्रकल्प
मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर महापालिकांच्या अखत्यारित असलेल्या प्रत्येक मैदानात पर्जन्य जलसंधारण योजना (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबविल्यास पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणावर बजत होऊ शकेल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. इच्छा असेल तर मार्ग निघतो. दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकतो  महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह तब्बल ३८ ठिकाणी मनसेतर्फे आजपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून इच्छा असेल तर मार्ग निघतो हेच यातून आम्ही दाखवून दिले असेही राज म्हणाले.
मनसेतर्फे शिवाजी पार्क मैदानावर राबविण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या कामास सोमवारी सुरुवात झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. महाराष्ट्रात तब्बल ३८ ठिकाणी मनसेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पर्जन्य जल संधारण प्रकल्प कामास आज सुरुवात झाली. त्यामध्ये बुलढाणा, सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, बीड, जालना, ठाणे, शहापूर आदी ठिकाणांचा समावेश आहे. त्यावेळी बोलताना राज म्हणाले, शिवाजी पार्कवरील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा खर्च मनसेतर्फे करण्यात आला आहे.  सत्तर हजार कोटी रुपये खर्चून अवघा एक टक्के जीन सिंचनाखाली येते हेच अजित पवार यांचे वैशिष्ठय़. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तर यांचे खिसे कसे भरणार असा सवाल राज यांनी केला.