संपामुळे एसटीला ४३९ कोटींचा फटका

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बस आणि इतर वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

st-bus-1

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे ४३९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील एसटी गाडय़ांची होणारी धाव व कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्याचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम असून सर्व मदार खासगी वाहतुकीवरच आहे.

एसटीच्या कामगार संघटनांच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून महागाई भत्ता आणि अन्य मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. २८ ऑक्टोबरला या मागण्यांसाठी अघोषित संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. विलीनीकरणाच्या मागणीसाठीही कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला व तो अद्यापही कायमच आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बस आणि इतर वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

आणखी ६१० कर्मचारी निलंबित मंगळवारी ६१० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार १९५ झाली आहे, तर रोजंदारीवरील ८० कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केल्याने ही संख्याही १ हजार ८२७ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 439 crore lose to msrtc due to strike zws

Next Story
कौशल्य शिक्षणासाठी ‘इन्फोसिस’बरोबर सामंजस्य करार
फोटो गॅलरी