मुंबई : बॉम्बे डाईंगचे तत्कालीन प्रमुख नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचण्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहभागी असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत आहे, असा दावा या खटल्यातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने केला आहे.प्रकरणाच्या तपासाला आणि खटल्याला लागलेला विलंब लक्षात घेता प्रभावशाली व्यक्तींना संरक्षण देण्यासाठीच सीबीआयने प्रकरणाचा तपास हाती घेतल्याचे सिक्वेराने न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबानी यांना आरोपी करण्यापासून तसेच १९९० मध्ये त्यांनी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे त्यांच्याविरोधात तपास करण्यापासून सीबीआयला कोण रोखत आहे, असा प्रश्नही सिक्वेराने उपस्थित केला आहे. मुकेश अंबानी हेच या कथित कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचे आणि सीबीआय रिलायन्सच्या पिंजऱ्यातील पोपट झाले आहे असा आरोपही त्याने केला. या प्रकरणी वाडिया यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्याचा आणि अंबानी यांनी १९९० मध्ये सीबीआयला दिलेल्या जबाबाचा विचार केल्यास उद्योगपतीच्या आदेशानुसार सहआरोपी कीर्ती अंबानी याने वाडिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष काढता येईल, असा दावा सिक्वेरा यांना न्यायालयात केलेल्या अर्जात केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused in nusli wadia murder conspiracy case cbi s attempt to save mukesh ambani zws