मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड आरे दुग्ध वसाहतीत बांधण्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आंदोलकांपैकी १९ जणांवर आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला सोमवारी अटक करण्यात आली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. बेकायदा जमाव केल्याप्रकरणी पोलिसांनी या आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो-३ची कारशेड कांजूरऐवजी आरे येथे हलवण्याचा निर्णय वर्तमान सरकारने घेतल्यानंतर पर्यावरणप्रेमी आरेमध्ये जाऊन आंदोलने करत आहेत. २८ जुलै रोजी आरे पोलिसांनी १९ आंदोलकांवर बेकायदा जमाव करणे, विनापरवानगी आरेत घुसणे इत्यादी आरोपांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याचाच भाग म्हणून तरबेज सय्यद या आंदोलकाला पोलिसांनी समन्स बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. सोमवारी तो पोलिसांसमोर हजर होताच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. उशिरा त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activist arrested for save aarey protest zws
First published on: 09-08-2022 at 04:23 IST