मुंबई : गुजराती रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते रसिक दवे यांचे शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मूत्रिपडाच्या विकाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री केतकी दवे आणि मुलगी रिद्धी दवे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात आले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
रसिक दवे हे गेली चार वर्षे ते मूत्रिपडाच्या आजाराशी झगडत होते. या आजारामुळे अशक्तपणा, रक्तदाबासारख्या समस्या वाढत गेल्या. ते दोन वर्षे ‘डायलिसिस’वर होते. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, मात्र शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘महाभारत’ मालिकेतील नंदाच्या भूमिकेतून रसिक दवे यांचा चेहरा घरोघरी परिचयाचा झाला होता.
First published on: 31-07-2022 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor rasik dave passed away famous actors gujarati theatre ysh