मुंबई : देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलने दुधाचा दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढवला आहे. नवा दर बुधवारपासूनच लागू होणार आहे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम बंगाल येथे नवे दर लागू होणार असल्याचे कंपनीने मंगळवारी जाहीर केले. उत्पादन आणि वितरणाचा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्धा लिटर अमूल गोल्ड आता ३१ रुपये, अर्धा लिटर अमूल ताजा २५ रुपये, तर अमूल शक्ती दुधाच्या अर्धा लिटरच्या पिशवीची किंमत २८ रुपये झाली आहे. दरम्यान, ‘मदर डेअरी’च्या दुधातही दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amul milk two rupees more expensive milk producing company ysh
First published on: 17-08-2022 at 00:47 IST