मुंबई : मालाड येथील मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. हे मैदान राज्य सरकारच्या अखत्यारीत असले तरी त्यावरून मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या मैदानाला अनधिकृतपणे दिलेले टिपू सुलतानचे नाव काढून टाकावे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. तर आमदार अस्लम शेख यांनी या मैदानाला भारतीय स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक  अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या मागणीवर विचार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला विनंती केली आहे. त्यामुळे या मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मालाड पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या मागे असलेल्या मैदानाबाहेर गेल्या वर्षी  टिपू सुलतानच्या नावाचा फलक लावल्यावरून सुरू झालेला वाद आजही सुरूच आहे. टिपू सुलतान हा हिंदूद्वेष्टा होता, असा आक्षेप घेत मैदानाला त्याचे नाव देण्यास भाजपने जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचे नाव देण्याची घोषणा तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aslam shaikh request for name ashfaqullah khan to tipu sultan park in malad zws