मुंबईमध्ये अनेक भागांत अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर येत असून पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील सहायक आयुक्त आपली जबाबदारी झटकू पाहात आहेत. ही जबाबदारी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली असली तरी यापुढे अनधिकृत बांधकामांसाठी साहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल. जबाबदारी झटकणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी दिला.
मुंबईतील कामांचा आढावा घेण्यासाठी मेहता यांनी शनिवारी विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.
जबाबदारी निश्चित
अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयातील इमारत बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2016 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्तांना इशारा
देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-02-2016 at 02:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant commissioner alert about unauthorized construction