‘मुंबई मराठी पत्रकार संघा’च्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना ‘पत्रकार दिना’ निमित्त दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावर्षीचे पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार वितरण समारंभ ६ जानेवारीला ‘पत्रकार दिन’ समारंभात हा पार पडणार आहे.
यंदाचा उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा ‘जयहिंद प्रकाशन पुरस्कार’ गिरीश कुबेर लिखित ‘टाटायन’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. ललित लेखनाबद्दल दिला जाणारा ‘विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांना देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट राजकीय बातम्यांसाठी दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. आझाद मैदान येथील पत्रकार भवनात होणाऱ्या ‘पत्रकार दिन’ समारंभात ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर
यंदाचा उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा ‘जयहिंद प्रकाशन पुरस्कार’ गिरीश कुबेर लिखित ‘टाटायन’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
Written by रत्नाकर पवार
Updated:

First published on: 10-12-2015 at 05:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award declared by patrakar sangh